मुलांनो, तुम्ही हे लक्षात घेतले असेल की वाहनांच्या नंबर प्लेट वेगवेगळ्या रंगाच्या असतात. कोणत्या प्रकारच्या वाहनांवर कोणत्या रंगाची नंबर प्लेट वापरली जाते हे तुम्हाला माहित असले पाहिजे. मग जाणून घ्या ह्या गोष्टीच्या रूपाने…
त्या दिवशी अथर्व आपल्या आजोबांसोबत स्कुटीवर पुढे उभा राहून जात होता. रस्त्यात समोरून एखादी कार आली की तो तिचं नाव घेत आजोबांना सांगत होता,
“आजोबा, ही बघा अजून एक टाटा पंच, ही मारुती वॅगनआर आणि ही टाटा नॅनो. ही गाडी ब्रेझा आहे, अशीच गाडी माझ्या काकांकडे पण आहे.”
खरं तर अथर्वला रस्त्यावर दिसणाऱ्या गाड्या त्यांची कंपनी आणि मॉडेलचे नाव ओळखून सांगायची खूप आवड आहे.
आजोबांनी विचारलं, “बरं अथर्व, तू कार पाहून लगेच सांगतोस की ही कोणत्या कंपनीची कार आहे. पण नंबर प्लेट पाहून सांगू शकशील का की ती कशी कार आहे?”
“कशी कार, म्हणजे?” अथर्वला आजोबांचा प्रश्न समजला नाही.
आजोबांनी समजावलं, “अरे, पुढे जी कार जात आहे तिची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची आहे, पण सर्रास इतर कारची नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असते. काही कारची तर हिरव्या रंगाची असते. असं का बरं?”
हा प्रश्न ऐकून अथर्व विचारात पडला. तो मागे वळून आजोबांकडे पाहत म्हणाला, “नाही आजोबा, मला माहित नाही! तुम्हीच सांगा ना.”
आजोबांनी सांगायला सुरुवात केली, “पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट असलेली कार ही खासगी कार असते, जी आपण वैयक्तिक वापरासाठी घेतो.”
अथर्व लगेच म्हणाला, “जसं आपल्या पप्पांची होंडा सिटी….”
“हो अगदी तशीच,” आजोबा हसत म्हणाले. “पण पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या गाड्या सार्वजनिक वाहनं किंवा भाड्याने चालणाऱ्या टॅक्सी असतात, ज्या सेवा आपण वेळोवेळी घेतो.”
अथर्वने पुढे विचारलं, “आणि आजोबा, हिरव्या रंगाची नंबर प्लेट कोणत्या गाडीवर असते?”
तेवढ्यात समोरून हिरव्या नंबर प्लेटची एक टाटा पंच गेली. अ-थर्व आनंदाने म्हणाला, “अरे आजोबा, बघा हिरव्या नंबर प्लेटची टाटा पंच!”
आजोबांनी सांगितलं, “हो, म्हणजेच ही कार बॅटरीवर चालणारी आहे.”
“वा! अगदी माझ्या छोट्या खेळण्याच्या कारसारखी, जी मी मजेत चालवतो,” अथर्व खुष होऊन म्हणाला.
आजोबांनी समजावलं, “हो, अगदी तशीच. फक्त यामध्ये बॅटऱ्या जास्त संख्येने आणि आकाराने मोठ्या असतात.”
तेवढ्यात एक ई-रिक्शा येताना दिसला. अथर्व ओरडून म्हणाला, “बघा आजोबा, या ई-रिक्शाची नंबर प्लेटही हिरव्या रंगाची आहे. म्हणजे हूसुद्धा बॅटरीवर चालते ना?”
“बरोबर! अगदी अचूक समजलं तुला,” नानाजी आनंदाने म्हणाले.
असं गप्पा मारता मारता अ-थर्व आणि त्याचे आजोबा त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले.