आंतरराष्ट्रीय आइसक्रीम डे/ International Ice Cream Day – 20 जुलै: आइसक्रीमने शिकवलेले मैत्रीचे आणि प्रेमाचे धडे

आइसक्रीम

चिंकीला एक वाईट सवय होती – ती आपल्या भाऊ पीयूषसोबत काहीच गोष्ट शेअर करत नसे. पण पीयूष मात्र तिला खूप जपायचा, तिची काळजी घ्यायचा.आइसक्रीम किंवा जे काही मिळायचे तो तिच्याशी शेयर करायचा. एक दिवस असं काही घडलं की चिंकीने स्वतःहून ही सवय बदलून टाकली. पुढे वाचा…

चिंकी आणि पीयूष ही दोघं गोड भाऊबहीण. मोठा भाऊ पीयूष नेहमी आपल्या लहान बहिणीची काळजी घ्यायचा, पण चिंकीला एक सवय फारच वाईट होती — ती कोणतीही गोष्ट आपल्या भावासोबत शेअर करायचीच नाही! पीयूष काही म्हणायचा नाही, उलट त्याला जे मिळायचं, ते प्रेमाने चिंकीला द्यायचा.

आइसक्रीम

एकदा संध्याकाळी बाबांनी विचारलं, “रविवारी कुठे जायचं?” चिंकी पटकन म्हणाली, “मॉलमध्ये जाऊया! रविवार म्हणजे आइसक्रीम डे! आपल्याला खूप सारी आइसक्रीम खायची आहे!”
हे ऐकून पीयूषलाही भारीच आनंद झाला. दोघांनी ठरवलं – किमान दोन-दोन फ्लेवर नक्की खायचे!

रविवार उजाडला. दिवसभर उन्हाने हैराण झालेले हे दोघं, संध्याकाळी बाबांसोबत मॉलमध्ये गेले. तिथल्या Ice Cream स्टॉलवर चमचमीत, रंगीबेरंगी आइसक्रीम्स लागलेली होती. थोडं पुढे एक टर्किश आइसक्रीमवाला खेळ करत करत Ice Cream विकत होता. पीयूष तिकडे गेला, गमतीने आइसक्रीम घेतली आणि आपल्या बहिणीला एक घास दिला.

चिंकीला टूटी-फ्रूटी फ्लेवर हवा होता, म्हणून ती बाबांसोबत दुसऱ्या स्टॉलवर गेली. परत आल्यानंतर पीयूषने तिची Ice Cream चव बघू दे म्हणून विचारलं, पण चिंकीने सवयीप्रमाणे नकार दिला.

हेदेखील वाचा: गोष्ट क्रमांक 15: सिंबाला मिळालं आपलं घर / Simba found his home

तेवढ्यात बाबांनी पीयूषलाही त्याची हवी असलेली Ice Cream दिली. दोघंही आइसक्रीम खाऊन मॉलबाहेर आले. बाबा गाडी आणायला गेले, आणि तेवढ्यात बोलता बोलता चिंकीच्या हातून Ice Cream खाली पडले.

चिंकीचं Ice Cream पाहून तिचे डोळे भरून आले. ती रडू लागली. पीयूष धावत तिच्याजवळ आला. म्हणाला,
“चिंकी, तू माझी आइसक्रीम घे. मी एक आधीच खाल्ली आहे. जास्त खाल्लं तर आजारी पडेन!”

हे ऐकून चिंकी थक्क झाली. ती हळूच म्हणाली,
“तू माझ्याशी Ice Cream शेअर करतोस? मी तर कधीच काही तुझ्याशी शेअर करत नाही!”

पीयूष हसून म्हणाला,
“ते काय झालं? तू माझी लाडकी बहीण आहेस. भाऊबहीण एकमेकांशी सगळं वाटून घेतात. आता लवकर खा, नाहीतर ही पण वितळून पडेल!”

हे ऐकून चिंकीने आपल्या भावाला प्रेमाने घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून हसू आणि आनंद दोन्ही वाहत होते.
त्या दिवसापासून चिंकीने स्वतःला एक वचन दिलं –
“आता मी माझ्या पीयूष दादासोबत सगळं शेअर करणार!”

तात्पर्य: सच्च्या प्रेमात वाटून घेणं हेच खरं सुख असतं! थोडं शेअर केल्याने आपलं प्रेम अधिक गोड होतं – अगदी आइसक्रीमसारखं!
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *