काय आहे गोष्टीत? एका जंगलात एक घमेंडी कावळा राहत होता, त्यामुळे त्याला कोणीही मित्र नव्हते. एके दिवशी तो आजारी पडला आणि अशक्त झाल्याने मदतही मागू शकत नव्हता. इतर प्राण्यांनी त्याची चिंता करत त्याला मदत केली, ज्यामुळे तो बरा झाला. या अनुभवातून त्याला मैत्रीचे महत्त्व समजले, आणि त्याने सर्वांची माफी मागून आनंदाने एकत्र राहण्याचा निश्चय केला. Read…
एका जंगलात एक घमेंडी कावळा राहायचा. त्यामुळे त्याला कोणताही मित्र नव्हता. त्या जंगलातील सगळे प्राणी एकमेकांशी सलोख्याने वागत असत. कावळ्यालाही मित्र बनवायचे होते, पण त्याच्या अहंकारी स्वभावामुळे तो कोणाशी बोलत नसे.
एकदा तो खूप आजारी पडला. कोणी काळजी घेत नसल्यामुळे तो अधिकच अशक्त होत गेला. त्याच्यात एवढीही ताकद उरली नव्हती की घराबाहेर जाऊन मदत मागू शकला. काही दिवस तो दिसला नाही म्हणून इतर प्राणी त्याची चिंता करू लागले. एका पोपटाने तर कावळ्यासोबत काहीतरी दुर्घटना घडल्याची शंका व्यक्त केली.
सर्व प्राणी जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा त्याची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी सगळे भांडण विसरून त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याला चांगले खायला दिले. सर्व मित्रांच्या काळजीमुळे तो लवकरच बरा झाला.
या घटनेनंतर त्याला मित्रत्त्वाचे महत्त्व समजले. आपल्या वागणुकीबद्दल त्याला फार पश्चात्ताप झाला. त्याने सर्व प्राण्यांची माफी मागितली आणि मैत्रीचा हात पुढे केला. सर्वांनीही त्याला क्षमा करून त्याला आपलेसे केले. आता सगळे आनंदाने, एकमेकांच्या साथीने राहू लागले.